दुर्गाष्टमी
दुर्गोत्सवाची पूजा बांधली
उजळले दीप पंचारती
फेर धरू या रास खेळू या
नाचू गाऊ अष्टमीच्या राती !!
फळाफुलांनी बहरलेली
अवनी हिरवा शालू लेई
चराचरा तृप्तीची भरती
नाचू गाऊ अष्टमीच्या राती !!
आदिशक्तीचे नऊ रूपाने
पूजन केले श्रद्धा भक्तीने
प्रार्थिले गाऊनीया आरती
नाचू गाऊ अष्टमीच्या राती !!
नऊ दिसांच्या आराधनेने
देवत्वाशी समरस होणे
जिवेभावे घागरी फुंकती
नाचू गाऊ अष्टमीच्या राती !!
अन्याय नको,सन्मानासाठी
दुर्गेपरी सशक्त बनावे
अनन्यभावे तिला भजती
नाचू गाऊ अष्टमीच्या राती !!
ज्योत्स्ना तानवडे
पुणे.५८
-----------------------------------------------
- महत्वाचे -
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित मजकुरात व्यक्त केलेली मतांशी साहित्य भरतीचे संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.
साहित्य भारती या वेबसाईटवर प्रकाशित साहित्याचे सर्वाधिकार ( कॉपी राईट ) त्या-त्या साहित्यिकांकडे आहेत. हे साहित्य पूर्वी इतरत्र प्रकाशित झालेले असू शकते. तसेच ते पुन्हा कोणत्याही प्रकारे प्रकाशित करण्याचा सुद्धा अधिकार साहित्यिकांचा आहे. पुन्हा प्रकाशित करताना पूर्व प्रसिद्धी म्हणून साहित्य भारतीचा उल्लेख करू शकता. या साहित्याचा पूर्ण अथवा अंशतः भाग संबंधित साहित्यिकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास कॉपीराईट कायद्यान्वये कारवाई होऊ शकते.
-- माध्यमांवर भेटूया --
![]() |
|||
![]() |
![]() |
![]() |
![]() |




